थोडा वेळ, थोडा वेळ म्हणतेस
म्हणता म्हणता किती वाट पाहायला लावतेस तू
करतेस नाहीन की नाहीन करत
हा विचार सारखा करायला लावतेस तू...
कामाच्या विचारांमध्ये हळूच शिरून
सगळं काही विसरायला लावतेस तू
तुझ्यावर रागवायचं म्हंटलं तरी..
खाली बघत हसून,माझ्या नाटकी रागाची वाट लावतेस तू....
तुझा हसवा तुझा रुसवा
धरला आहे मी अबोला सांगत, असच शांत बसतेस तू
बोलता बोलता मधेच तूझं ते माझ्यामुळे लाजणं
तुझ्यात नेहमीसाठी हरवून जायला, मला भाग पाडतेस तू ...
No comments:
Post a Comment