सरळ असेल ते प्रेमच कसे असेल
तुझ्या सोबत आयुष्य नक्कीच वेगळे असेल
telphone वर रोज असतेस तू
माझ्यापासून दूर नसतेच तू
गप्पान मधल्या स्वप्नांसाठी
जीव आसुसला एका भेटी साठी
तुझ्या भेटीसाठी आतुर मन
भेटल्यावर अचानक अनोळखी होते
ठरवलेल्या सगळ्या गप्पांची
मुक्या माणसांची बैठक होते
तुझ्या सोबत असताना
क्षणांची आपापसात चढाओढ असते
अजून लवकर कसे जाता येईल
याचीच त्यांना ओढ असते
सहवासाच्या क्षणां मध्ये
बाकी कसले भानच नसते
एकांता मध्ये पण
तिच्याच आठवणींचीच गर्दी असते
दिवसभराच्या गडबडीमध्ये
कामाच्या धावपळीमध्ये
तिची आठवण हीच एक
हळुवार वाऱ्याची झुळूक असते
तुझ्या असण्याने सगळेच काही वेगळे असते
आठवणींना पण एक मखमली झालर असते
सरळ असेल ते प्रेमच कसे असेल
तुझ्या सोबत आयुष्य नक्कीच वेगळे असेल
No comments:
Post a Comment