Friday, March 5, 2010

Life मध्ये proportion असतच कधी

Life मध्ये proportion असतच कधी
आकडे जूळवण्यातून वेळ उरतोच किती

पहिल्या भेटीची आठवण म्हणून
बिलाच्याच मागे कविता लिहून
व्यावहारिक प्रेम व्यक्त करतय कुणी
life मध्ये proportion असतच कधी

Valentines day साजरा करण्या साठी
आपल्या Valentine ला मिठी मारत
मागच्या पोरी बघतंय कुणी
life मध्ये proportion असतच कधी

लग्नाच्या खर्चिक बैंड बाज्यातून सटकुन
अहेरात cash आली किती
हे बघताय कुणी
life मध्ये proportion असतच कधी

निरोगी आयुष्यासाठी नव्हे
त by -pass चा खर्च वाचवण्यासाठी
रामदेव बाबा करतय कोणी
life मध्ये proportion असतच कधी

माणसे जोडण्याचा प्रयत्न
आपण करतोच कधी
life मधले proportion
पैश्या पेक्षा वेगळा असतच कधी
Life मध्ये proportion असतच कधी
आकडे जूळवण्यातून वेळ उरतोच किती

3 comments:

shailesh said...

very nice. proportionate.

Unknown said...

Sahi hai bosssss

Unknown said...

VERY NICELY COMPOSED
KEEP IT UP