आजचा चंद्र म्हणे खूप रोमांटीक
कोणाला तरी सोबत घेऊन रोमांटीक व्हाव
किंवा त्याला पाहून प्रेम पत्र तरी लिहाव
दोन्ही करण्या साठी कोणी तरी लागतय
तिथेच येऊन आमच घोड रुसतय
दोन्ही गोष्टीन मध्ये चंद्र हा आलाच
गाय (gay) नात्यांच्या युग हे
त म्हंटल त्याला पाहून त्यालाच प्रेमपत्र टाकावं
तंत्र ज्ञानाच्या या युगात
इस्रो २०१६ मध्ये भारतीय चंद्रावर उतरवणार म्हणे
वाचून वाटल करून पहावा प्रयत्न;
कदाचित २०१० मध्ये इस्रो चंद्रावर पत्र तरी पोचवेल
चंद्रा तुझा मंद प्रकाश
करतो बुद्धीला मतिमंद
म्हणूनच प्रत्येक प्रेयसी
म्हणते भेटूयात चांदण्या रात्री
प्रत्येक प्रियकराचा
चंद्र असतो खाजगी
प्रेयसीच्या प्रत्येक रूस्व्याला
चंद्र भेट म्हणून करतो तो हाजीर
चंद्र होऊन विचार करता
चंद्र म्हणतो ,तुम्ही आहात नाटकी
वट पौर्णिमेला (करवाचौत ला) मला पाहून
शेवटी जाता आपल्या नवऱ्या कडेच
चंद्राकडे पाहून
काय काय आठवतय
चांदोबाच्या गोष्टीन मधून
सगळ बालपण धावतंय
आज चंद्राला पाहून खरच
खूप काही आठवतंय
त्याच्या असण्याच
खरच आज अप्रूप जाणवतंय
1 comment:
translation plz :P
Post a Comment