Saturday, August 6, 2011

जेंव्हा friendship band रिबीन चा होता फक्त,

जेंव्हा friendship band रिबीन चा होता फक्त,
तेंव्हा पासूनचा तो friendship day चा हट्ट

शाळेतला तो friendship day
आठवण येते मग आवडत्या मित्र /मैत्रिणी कडून
बेस्ट friend ची रिबीन येते की नाहीं
या विचाराने मनात झालेले ते खुट्ट

कॉलेजमधला तो friendship day
मैत्रिणीला surprise Red Rose देण्यासाठी
सकाळी उठून गुलाब शोधण्याचा तो प्रयत्न
शेवटी स्वतः देण्याची हिम्मत न झाल्याने ,
दरवाज्यातच गुलाब ठेऊन पळण्याचा तो क्षण

लग्न ठरल्यावराचा तो friendship day
बायकोला online delivery sevice ने पाठवलेला
तो चॉकलेट केक आणि एक लाल गुलाबांचा गुच्छ
त्यानंतर लगेचच वाढलेला तो मोबाईल चा खर्च

अश्या सगळ्या आठवणींचा हा friendship day
आहेत ते सोबत हा विचार पण पुरेसा असतो फक्त
ज्यांच्या असण्याने जीवनाला येतो अर्थ
अश्या सगळ्या मित्र मैत्रिणी साठीचा हा friendship day

Thanks to my all friend who have made my life amazing with your presence as and when possible.

Still cherish each and every moment spend with you…………..