मार्ग धरून चालत राहणं आपल्या हातात असतं
पण विचारात धरलेला मुक्काम असेलच तिथे
याची चाचपणी करण हातात असतच कधी
ठरवलेली वाटचाल करून इच्छित मुक्काम नाहीन आला
तर मार्ग बदलायचा कि मुक्काम.........
हे ठरवण्याशिवाय आयुष्य कठीण असतच कधी
ठरवतो आपण खूप, पण तिथे पोहोचतोच आपण
अस होतच किती
प्रयत्न करून ते सार्थ होण्याचे क्षण असतातच ते किती
तरी प्रयत्ने वाळू रगडीता तेल ही गळे
हे आठवत प्रयत्न करण्या शिवाय आपल्या हातात असतेच काय